मेघालय वृत्तसंस्था (१८ नोव्हेंबर २०२० पीटीआय) : पद्म पुरस्कार विजेत्या पत्रकार पेट्रीसिया मुखीम यांनी एडिटर गिल्ड ऑफ इंडियाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ही संघटना फक्त सेलिब्रेटी पत्रकारांची पाठराखण करते असा आरोप त्यांनी केला आहे. मुखीम या द शिलाँग टाईम्सच्या संपादक आहेत.गेल्या आठवड्यात मेघालय उच्च न्यायालयाने मुखीम यांच्याविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास नकार दिला होता. पोलिसांनी मुखीम यांनी जुलैमध्ये केलेल्या फेसबुक पोस्टवरुन त्यांच्यावर तक्रार केली होती.

मुखीम यांनी दावा केला आहे की त्यांनी या केसबाबतची एडिटर गिल्डला तपशीलवार माहिती दिली होती. त्या म्हणाल्या माझी एडिटर गिल्डच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची इच्छा आहे. हे करण्यासाठी अनेक कारणे आहेत. पहिले मी त्या सगळ्यात जास्त वाचल्या जाणाऱ्या वर्तमान पत्र आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असलेल्या वेब पोर्टलच्या सेलिब्रेटी संपादकात बसत नाही.भौगोलिक दृष्ट्या आणि संघटनेतील माझ्या स्वतःच्या स्टेटस हा तुटलेला आहे. मला येथे श्रेणीवाद दिसत आहे. मी माझ्या केससंदर्भातील उच्च न्यायालयाची ऑर्डर गिल्डला निदान ही संस्था याचा निषेध करणारे वक्तव्य तरी प्रसिद्ध करेल या आशेवर सादर केली होती. पण, त्याच्यावर उच्च स्तरावर तेव्हा आणि आताही पूर्णपणे शांतता दिसून येत आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या केसचा पत्रकारितेशी कोणताही संबध नाही ती एक आत्महत्येला प्रवृत्त करणारी गंभीर केस आहे

त्या पुढे म्हणाल्या या उलट गिल्डने अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर तत्परतेने निषेध करणारे वक्तव्य प्रसिद्ध केले. अर्णब हे एडिटर गिल्डचे सदस्यही नाहीत.त्यांच्या केसचा पत्रकारितेशी कोणताही संबध नाही ती एक आत्महत्येला प्रवृत्त करणारी गंभीर केस आहे. हे गिल्डचे सेलिब्रेटी पत्रकार आणि अँकर यांच्याबद्दल आवाज उठवणे आणि आपल्याच संघटनेचे सदस्य असणाऱ्या पत्रकाराच्या केसकडे दुर्लक्ष करणे हे उत्तम उदाहरण आहे.असे हे खरमरीत पत्र मुखीम यांनी एडिर गिल्डच्या अध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या सीमा मुस्तफा यांना लिहीले आहे.

मुखीम यांनी ४ जुलैला फेसबुकवर पोस्ट लिहीत लॉसोहटोन गावाच्या प्रशासनावर टीका केली होती. गावातील बास्केटबॉल कोर्टवर पाच मुलांवर मास्क घातलेल्या लोकांनी हल्ला केले होता. या प्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती यावरून मुखीम यांनी ही टीका केली होती. त्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा आणि दोरबार शनॉग यांच्याकडे गावच्या स्थानिक प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, मेघालयाच्या गावाच्या समितीने मुखीम यांच्याविरुद्ध भावना दुखवल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीचा आधार घेत पोलिसांनी फौजदारी खटला दाखल केले आहे. याचबरोबर त्यांच्यावर अपमानाचाही खटला दाखल केला आहे. याविरोधात मुखीम यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती पण, तेथेही न्याय मिळाला नाही म्हणून त्या आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.