अहमदनगर (दि १६ नोव्हेंबर २०२०) : जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करून, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. ऐन दिवाळीत बाजार पेठा फुल्ल झाल्या असून करोनाचा संसर्गाचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विनामास्क फिरणार्‍यावर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून,चार दिवसात 909 जणांवर कारवाई करून 90 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती शहर पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी दिली.

शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याहदीत 240 कारवाई करून त्यांच्याकडून 47 हजारांचा दंड तर कोतवाली हद्दीत 472 कारवाई करत 24 हजारांचा दंड तसेच भिंगार पोलीस ठाण्याहद्दीत विनामास्क फिरणार्‍या 197 जणांवर कारवाई करत 19 हजारांचा दंड करत असा एकून 90 हजार 900 रुपयंचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक कडक करण्यात येणार असल्याचे ढुमे यांनी सांगितले.

नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दिवाळी निमित्त बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरु आहेत.मात्र, अनेकांकडून नियमांचे उल्लघंन होत असून शहरात सोशल डिस्टंसींग, व विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे करोनाचा धोका संभावत असल्याने कारवाई सुरु केली आहे. शहर पोलिसांच्या वतीने शहरातील चौका चौकात भिस्तबाग चौक पथके तैनाक करण्यात येणार असून कारवाई अधीक कडक करण्यात येणार आहे.