*दिनांक: १६ नोव्हेंबर २०२०, रात्री ७-१५ वाजता*
*आतापर्यंत ५७ हजार ३९३ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के*
*आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज तर १८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

अहमदनगर: जिल्ह्यात आज १६९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ३९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२७९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६० आणि अँटीजेन चाचणीत ८६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, नगर ग्रामीण१०, नेवासा ०१, पारनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले ०५,  जामखेड ०२, कोपर गाव ०२, नगर ग्रामीण ०५ पाथर्डी ०४, राहता ०४, , राहुरी ०२,  संगमनेर ०८, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ८६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अकोले ०५, जामखेड ०२, कर्जत ०५, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०४, पाथर्डी २२, राहता १६, संगमनेर १३,  शेवगाव ०४, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्येमनपा ३३, अकोले १०, जामखेड ११, कर्जत ०४, कोपरगाव १०,  नगर ग्रा.१४, नेवासा १४, पारनेर ०३, पाथर्डी २५, राहाता ११, राहुरी ०६, संगमनेर १४,  शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०७, मिलिटरी हॉस्पिटल  ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या=५७३९३
*उपचार सुरू असलेले रूग्ण=१२७९
*मृत्यू=८९९
*एकूण रूग्ण संख्या=५९५७१


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*माझेकुटुंब_माझीजबाबदारी*