अहमदनगर (दि १२ नोव्हेंबर २०२०) – अहमदनगर जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या/नेमणुका करण्याबाबतच्या चर्चा होवून त्यांच्या बदल्याबाबत व नेमणुकाबाबत योग्य विचार करून जनहितार्थ कायदा व सुव्यवस्था प्रशासकीय निकडीनुसार व विनंतीनुसार सन 2015 च्या महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 22 न चे पोटकलम (1) व (2) प्रमाणे पोलिस उपनिरीक्षक,सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. बदल्या झालेल्या अधिकार्‍यांचे नाव सध्याचे नेमणुकीचे ठिकाण- बदलीचे नवीन ठिकाण खालीलप्रमाणे आहे.-

पो.नि. प्रविणचंद विश्‍वनाथ लोखंडे (कोतवाली-शिर्डी),

पो.नि. राकेश आण्णाप्पा मानगावकर (कोपरगाव शहर-कोतवाली),

पो.नि. अभय मुकुंद परमार (संगमनेर शहर-नियंत्रण कक्ष),

पो.नि. मुकुंद काशिनाथ देशमुख (राहुरी-संगमनेर),

पो.नि. हनुंत झुंबरराव गाडे (साई मंदिर सुरक्षा,शिर्डी- राहुरी),

पो.नि. प्रभाकर भाऊराव पाटील (जामखेड-नियंत्रण कक्ष),

पो.नि. अविनाश शंकर शिळीमकर (नियंत्रण कक्ष-शहर वाहतूक शाखा),

पो.नि. सुहास भाऊराव चव्हाण (नियंत्रण कक्ष – आर्थिक गुन्हे शाखा),

स.पो. नि. प्रकाश अधिकराव पाटील (लोणी- शहर वाहतूक शाखा),

से.पो.नि. समाधान सुरेश पाटील (श्रीरामपूर शहर- लोणी),

स.पो.नि. सचिन अशोक बागुल (राहुरी- प्रभारी अधिकारी शनिशिंगणापूर),

स.पो.नि. रामचंद्र तुकाराम कर्पे (नव्याने हजर- प्रभारी अधिकारी सोनई),

स.पो.नि. राजेंद्र अशोक सानप (श्रीगोंदा-स्थानिक गुन्हे शाखा),

स.पो.नि. सोनाथ रबाजी दिवटे (नव्याने हजर- कर्जत पोलिस ठाणे),

स.पो.नि. महेश ईश्‍वर जाणकर (नव्याने हजर- जामखेड),

पोलिस उपनिरीक्षक आश्‍विनी रघुनाथ पाटील (नव्याने हजर- वाचक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस अधिक्षक कार्यालय तसेच अतिरिक्त कार्यभार अर्थशाखा).बदली झालेल्या अधिकार्‍यांनी बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत हजर होवून अनुपालन अहवाल कार्यालयास सादर करावा. हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे बदली आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.