भारतरत्न मौलाना आझाद जयंती निमित्ताने

मौलाना आज़ाद यांचा जन्म ११ नोव्हे.१८८८ रोजी सऊदी अरब च्या पवित्र मक्का शहरात झाला.त्यांनी आपला पुर्ण जिवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलं ११ नोव्हेंबर यांची जयंती देशभरात शिक्षण दिन म्हणुन साजरी केली जाते. मौलाना आज़ाद यांच्या जीवना विषयी एका लेख मध्ये लिहिणं अशक्य गोष्ट आहे. मौलाना आझाद यांच्या जीवनात दोन प्रमुख गोष्टी राहिलेली आहे.एक म्हणजे हिंदू-मुस्लिम एकात्मता व दुसरा मुस्लिम समाजाने शिक्षण क्षेत्रात पुढे यावा.

मौलाना आज़ाद यांचा शिक्षणा विषयी स्वप्न साकार करण्यासाठी मुस्लिम समाज इतिहासातून बोध घेतील का ? कारण देशाच्या विकासात या समाजाचा मोठा सहभाग आहेत यात काही शंका घेण्याचे कारण नाही.मात्र आज हा समाज शिक्षणापासून खुप वंचित आहे.काही गोष्टी इतिहासातून पहावा लागेल,९८० ते १०३७ अविसिना यांनी लिहिलेले वैद्यकीय ग्रंथ, विश्र्वकोश युरोपच्या विद्यापिठात सतराव्या शतकापर्यंत पाठ्यपुस्तक आणि संदर्भ ग्रंथ म्हणुन अभ्यासले जात होते.

   अविसिना हे नावं हे लॅटिन रूप आहे.त्यांचे खरे नावं अबु अली अल हुसेन ईब्न अब्दुल्ला ईब्न अल हसन ईब्न अली ईब्न सिना होते. या नावाचे छोटे रूप ईब्न सिना म्हणुन प्रसिद्ध आहे.मध्य युगातील हा मुस्लिम मणुष्य प्रकांड पंडित होता.ईतिहास संशोधक यांचा गौरव ऑरिस्टॉटलला मागे टाकणारा तत्ववेता म्हणुन ही करतात.वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र,तत्वज्ञान अशा बहुतेक क्षेत्रात पारंगत होते.

  आज मुस्लिम समाजाची स्थिती पाहली तर ज्ञान व संशोधनशी कोणताही संबध दिसत नाही.मध्ययुगीन मुस्लिम संशोधक शास्त्रज्ज्ञानची प्रचंड मोठी चमकधमक (प्रसिद्धी) आहे. उदा.अबुयुसुफ अलकिंदी (अलकिंदुस), जब्बार ईब्ने हय्यान,हुनैन ईब्नं ईस्हाक (ज्युन्निटीयस), जावित ईब्नं कुरैश,गणित मॊहम्मद ईब्न मुसा अलखवारिजमी (अलगौरिथ), मोहम्मद अलराज़ी,आबुनसर अलफराबी(अलफराबीयस), अबुहसन अलमसुदी,अबुअली हाशम,अबुरेहान अलवैरूनी, अब्दुल कासिम अलमाजरिती, आबुहामिद मोहम्मद अल गज़ाली, रहेमान अल खाज़िनी,अबु अलफैज़ ऊमर खैय्याम,अबु अल वाहिद मोहम्मद ईब्न रशद, नसिरुद्दीन अल तुसी,कुत्बूद्दीन अल शिराजी,अब्दुल रहेमान ईब्नं खल्दून, इत्यादी,ईत्यादी.मध्ययुगीन स्पेन मधील प्रसिध्द कुर्द येथे सतरा विद्यापीठ सत्तर सार्वजनिक ग्रंथालय आणि लाखो पुस्तके होती अशीच स्थिती बगदाद, दमिश्क, निशापुर आदि शिक्षण केंद्राची होती.

ज्ञानाची भुक कूरान शरीफने निर्माण केली.या पवित्र ग्रंथात अल्लाहने ज्ञान मिळवीणे पुरूष व स्त्रियांवर बंधनकारक केले.या पवित्र ग्रंथात हे ही सांगितले की जगातील सर्व माणसे एका आदमची लेकरे आहोत. तसं पाहिलें तर आजच्या युगात ही माजी राष्ट्रपती आदरनीय ए.पी.जे अब्दूल कलाम सारखे मोठे सांयनटीस्ट संशोधक होवून गेले.व नुकतेच ज़हीर अली यांनी नासा मध्ये काम करून चंद्रावर पाण्याचा शोध लावला.शिक्षणापासुन वंचित राहण्याचे या समाजाचे अनेक कारण आहे, परंतु  एक प्रमुख कारण आर्थिक दुर्बलताही आहे.आणि उच्चशिक्षणसाठी भरपुर आर्थिक तरतूद ही सर्वांच्या आवाक्याबाहेर ची गोष्ट होय.म्हणुन सरकारने व स्वयंसेवी संस्था इत्यादींनी निदान शिक्षणांत आरक्षण द्यायलाच हवे.                    

अल्पसंख्याक विकास महामंडळात मौलाना आझाद जयंती साजरी

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : ओल्ड कस्टम हाऊस येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात मौलाना आझाद जयंती साजरी करण्यात आली. राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिस शेख यांच्यासह महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

             
     एकदा रात्री  २/३  वा.ची वेळ  मौलाना आझाद यांचे मित्र बाहेर गावाहून येत असतांना त्यांनी पाहिलं एवढं रात्री मौलाना आझाद काही काम करीत आहे, त्या माणसाने विचारलं मौलाना एवढ्या रात्री का काम करताहेत तुम्ही? बाकीचे सर्व नेते झोपलेले आहे, मौलाना आझाद यांनी अत्यंत प्रभावी उत्तर दिले, बाकीचे सर्व नेते झोपलेले आहे कारण त्यांचा समाज जागृत आहे व मला या साठी  अहोरात्र जागृत रहावं लागतं की माझा समाज झोपलेला आहे! मौलाना आझाद यांनी हिंदु मुस्लिम एकात्माते साठी मनापासून काम आपल्या देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती होण्यास त्यांचा प्रखर विरोध होता.

“हज़ार बार नर्गिस अपनी बे नुरी पर रोती है!
बडी मुश्कील से होता है एक बार चमन मे दिदावर पैदा”!


 शेख ईदरीस मोहम्मद शफी
अध्यक्ष जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटर

संगमनेर        मो.9890524092