( छाया : अनिल शाह)

अहमदनगर (दि ९ नोव्हेंबर २०२०) : रॉयल एनफिल्डची मेट्युअर 350 सी.सी. ही दुचाकी निश्‍चितच ग्राहकांच्या व तरुणाईच्या पसंतीस उतरेल, असे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.नगर-मनमाड रस्त्यावरील कराचीवाला ऑटोमोबाईल्स येथे प्रथमच नगरमध्ये आलेल्या मेट्युअर 350 सी.सी. या दुचाकीचे अनावरण व विक्रीचा शुभारंभ अभिषेक कळमकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शो-रुमचे संचालक प्रभूशेठ कराचीवाला, निखिल व विशाल कराचीवाला, मॅनेजर संकेत वाघमोडे, अभय कांकरिया, भैय्या परदेशी आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी पहिले ग्राहक रवींद्र सुपेकर, निखिल सुपेकर यांना दुचाकीची प्रतिकात्मक चावी देण्यात आली.