काँग्रेस नेत्यांची टीका : अहमदनगर शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग

अहमदनगर । मोदी सरकारने देशातील शेतकर्‍यांना उध्वस्त केले. काळे कायदे करून देश उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे. बाजार समित्यांनी धोक्यात आणत शेतकर्‍यांची विक्री व्यवस्था मोडून काढण्याचे काम केले जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यव्यापी वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीमध्ये केली. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसच्या लालटकी कार्यालयाधून या डिजिटल रॅलीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते.

यावेळी ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अनंतराव गारदे, रियाज शेख, सय्यद खलील, शंकर आव्हाड, अति भांड, विशाल कळमकर, प्रमोद अबुज, अनिस चुडीवाला, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, चिरंजीव गाढवे, रॉबिन साळवे, संजय भिंगारदिवे, योगेश काळे, इंटक काँग्रेसचे हनीफभाई शेख, र्वीं. सुरेश सोरटे, र्वीं. चेतन रोहोकले, र्वीं. अनिल घाडगे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.
शहर जिल्हा काँग्रेसचे मुबीन शेख, अन्वर सय्यद, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.

मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, क्रीडा विभागाचे प्रवीणदादा गीते, स्वप्नील पाठक आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी अहमदनगर शहराच्या विविध प्रभागामधून या डिजिटल रॅलीमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते. अहमदनगर जिल्ह्यात 650 पेक्षा जास्त ठिकाणांहून कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. तर राज्यात 10,000 पेक्षा जास्त गावांमधून डिजिटल स्क्रीनच्या माध्यामातून हा कार्यक्रम शेतकर्‍यां पर्यंत पोचवण्यात आला.

संगमनेर (नाशिक विभाग), कोल्हापूर (पुणे विभाग), अमरावती (अमरावती विभाग), नागपूर (नागपूर विभाग), औरंगाबाद (मराठवाडा विभाग) राज्याच्या या वेगवेगळ्या विभागातून काँग्रेस पक्षाचे मंत्री आमदार, खासदार जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खा. राजीव सातव, राष्ट्रीय सचिव वाशी रेड्डी, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे हे उत्तर महाराष्ट्र विभागातून संगमनेर मधून यात सहभागी झाले होते.