बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या आणि त्यांनंतर या केस मध्ये आलेले अनेक वळण आपण सर्व पाहत आहोतच यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रिया चक्रवर्ती मीडियाने सर्वाधिक कव्हरेज देउन अखंड भारतात रियाने चहा घेतला कि नाहि पासून तर रिया वॉशरूम ला गेली का नाही पर्यंत तसेच रिया गाडीत बसली पासून रियाने गाडीची खिडकी लावली पर्यंत रियाच्या घरी फूड डिलेव्हरी वाला आला मीडियाने त्याचाही interview घेतला रियाच्या भाजीवाल्यापासून तर रियाच्या दुधवाल्यापर्यंत आपल्याला सर्व दाखविले गेले आज रिया जामिनावर बाहेर आली म्हणून आता रियाने काय केले जेलमध्ये पासून रिया घरी कशी गेली पर्यंत हे शक्यतो ऐकण्यास मिळणार नाही धन्यवाद मुंबई पोलिसांचे त्यांनी सिग्नल वर रियाची गाडी थांबली तर मुलाखत घेऊ नका आणि कुठेही रस्त्यावर अडवणूक करू नका अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना जारी केल्या आहेत काही आरडा ओरड करणारे चॅनेल आता पोलिसांच्या या सूचनांचे किती पालन करतील ते पुढे कळेलच एवढे मात्र नक्की कि रस्त्यावर रिया आणि तिची गाडी कुठे चालली आणि कुठे थांबली आणि किती सिग्नल लागले आणि किती वेळा रियाने खिडकीतून बाहेर पहिले आणि किती वेळा मोबाइल पाहिले आणि रिया गाडीमध्ये रडली का गाडीतच पडली अशा बातम्यांना सध्या तरी आळा बसेल असे वाटते

रियाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सुशातं सिंह प्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविक सोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलाहायकोर्टाने रियाला जामीन मंजूर केला असून तब्बल एक महिन्यानंतर ती जेलमधून बाहेर येणार आहे. दरम्यान यावेळी तिचा पाठलाग करु नये अशी सूचना मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. मीडियासाठी या सूचना कऱण्यात आल्या असून मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त केलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

“कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत किंवा व्हिजुअल्स घेणं कायद्यानं गुन्हा आहे. यातून तुम्ही स्वत:चे तसंच रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घालत असता. याबाबत मुंबई पोलीस अतिशय कडक कारवाई कऱणार आहे. चालकच नाही तर त्याला जो सूचना देत आहे किंवा तसं करण्यासाठी भाग पाडत आहे त्याच्यावरही कारवाई केली जाईल,” असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.