केंद्र सरकारकडून नियंत्रण क्षेत्र वगळता इतर परिसरातील शाळा, सिनेमागृहे 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी अनलॉक-5 च्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून नियंत्रण क्षेत्रातील लॉकडाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी विद्यार्थ्यांवर
उपस्थितीची सक्ती शाळांना करता येणार नाही
. शाळेत जाऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र शाळेत सादर करावे लागेल. शाळांनी आरोग्य तसेच सुरक्षेची कार्यप्रणाली तयार करावी, असेही सांगण्यात आले आहे.


राज्याच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे शाळांना कडेकोट पालन करावे लागेल.पीएचडी, पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रयोगशाळा सुरू करण्याची मुभा पीएचडी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे विज्ञान तसेच तंत्रज्ञान शाखेतील विद्याथ्यासाठी 15 ऑक्टोबरपासून प्रयोगशाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खेळाडूंसाठी जलतरण तलाव 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी किमान मर्यादा हटवली सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेत सुरू करण्यास तसेच मनोरंजन पार्क, नियंत्रण क्षेत्राबाहेर व्यापार मेळावे 15 ऑक्टोबर पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक,धार्मिक तसेच राजकीय कार्यक्रमांनाही 15 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे. बंद सभागृहात कार्यक्रम टक्के क्षमतेत घ्यावे लागेल.मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. कार्यक्रमस्थळी थर्मल स्कॅनर आणि हँड सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. खुल्या परिसरात कार्यक्रम घेतानाही या अटी बंधनकारक राहतील. राज्य, केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही स्वरूपात लॉकडाऊन लावता येणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे