कागल (दि ४ सप्टेंबर २०२०) : आतापर्यंत ११०० कोरोनाचे रुग्ण कागल तालुक्यात आढळून आले आहेत. तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरानाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी कागल, मुरगूड शहरासह संपूर्ण कागल तालुक्यात दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात येत असुन रविवार दि. ६ ते १५ सप्टेंबर अखेर हा कर्फ्यू लागू राहणार आहे. तरी कर्फ्यूला साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (दि.४) केले. त्यांच्या या निर्णयाचे नागरीकांमधून स्वागत होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.या जनता कर्फ्यूमध्ये दूध, औषधे वैद्यकीय दवाखाने, शेती सेवा केंद्र सरकारी निमसरकारी कार्यालये वगळण्यात आली आहेत. खाजगीमध्ये कामाला जाणारे आहेत. ‘एमआयडीसी’ मध्ये कामाला जाणारे आपले आयडेंटी कार्ड दाखवुन जावू शकणार आहेत. बँका बंद राहतील. ‘एटीएम’ सुरु राहतील. कोणत्याही परिस्थीतीमध्ये मास्क लावलाच पाहीले. यासाठी पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवावा अशा सुचना देखील त्यांनी या बैठकीत केल्या.