अनेक संस्थांनी वाहिली श्रध्दांजली !      

संगमनेर (दि १२ ऑगस्ट २०२०) :-  ऐ वतन एक रोज़ तेरी खाक मे खो जायेंगे सो जायेंगे! मरके भी नही तूटेंगा रिश्ता हिंदुस्तान से, ईमान से,! आंतरराष्ट्रीय निर्भिड ऊर्दू शायर प्रो.डॉ.राहत ईंदौरी यांचा काल कोरोना तथा ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले.वास्तविक पाहता त्यांच्या निधन वार्ता वर विश्र्वास बसेना.परंतू मृत्यू ने कोणाला सोडलं?  राहत ईंदौरी यांच्या जन्म १जानेवारी १९५०रोजी मध्ये प्रदेशच्या ईंदौर येथे झाला. त्यांचा शिक्षण प्राथमिक ते पि.एच.डी.पर्यंत ऊर्दू मध्ये झाले ऊर्दू एवढच हिंदी वर ही प्रभुत्व होता. प्राध्यापकच्या पेश्यात ऊर्दू शायरीत त्यांची रूची वाढीस लागली,व सर्व प्रथम १९६८ मध्ये कवी संमेलन मध्ये भाग घेतला व शायरी, कवितांमध्ये भरपुर वाहवाह मिळाली,व पुन्हा पाठीमाघे पाहिला नाही.व राहत कुरैशी ते राहत ईंदौरी झाले. ऊर्दू मुशायरा एवढच हिंदी कवि संमेलन मध्ये ही लोकप्रिय होते.त्यांच्या शायरी मध्यें मनापासून देशप्रेम भरलेले होते. त्यांचा “धुप धुप,”मेरे बाद”,”पाचवांदरवेष,”नाराज़” इत्यादी साहित्य लोकप्रिय आहेत.राहत ईंदौरी यांना, मध्ये प्रदेश सरकारने नुकतेच “शिखर”पुरस्काराने सन्मानित केले.

दर वर्षी संगमनेर शहरा सारखेच श्रीरामपूर येथेही सय्यद बाबा ऊरसानिमित्ताने मुशायरा कवी संमेलनाचे आयोजन केले जाते, काही वर्षांपूर्वी ऊरूस निमित्ताने विशेष कवी म्हणून राहत ईंदौरी होते.व सदर मुशायरया मध्ये आम्ही हमखस हजर होतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतांना महाराष्ट्र ऊर्दू बचाव समितीचे अध्यक्ष अब्दुल्ला चौधरी, जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटर चे अध्यक्ष शेख ईदरीस, कार्य अध्यक्ष सय्यद असिफ, यांनी राहत ईंदौरी यांच्या  श्रीरामपूर मुशायरया च्या अनेक आठवणींना उजाळा दिला.ते निर्भिड होते.म्हणुनच एवढे लोकप्रिय होते.रात्री१०वा. वेळ संपल्यांवर ते खुप नाराज़ झाले.मात्र लोकांच्या आग्रह खातीर एक शेर सांगितलं,”फैसला जो भी हो मंज़ुर होना चाहिए,महोब्बत हो या जंग भरपुर होना चाहिए. त्यावेळी आम्ही  त्यांना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले व त्यांनी विनम्रपणे स्विकारले होते. यावेळी रशीद गुरुजी,शानु बेगमपुरे, दस्तगीर शाह,शानु बागवान इत्यादींनी श्रध्दांजली वाहिली.

” मै मर जाऊ तो मेरी एक अलग पहचान लिख देना,
लहु से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना”

Rahat Indori
Video Courtesy SET INDIA