स्वाभिमानी संघटनेचे दूध सांड आंदोलन दूध दरवाढी साठी जागोजागी दूध सांड सुरु

अहमदनगर (२१ जुलै २०२०) : स्वाभिमानी संघटनेचे दूध सांड आंदोलन दूध दरवाढी साठी जागोजागी दूध सांड सुरु केली असून महाराष्ट्रभर हजारो लिटर दूध रस्त्यावर फेकून देण्यात येत आहे तुमचे आंदोलन आणि मागण्या योग्यच असतील परंतु अशी दुधाची हेळसांड कृपा करून थांबवावी सरकार तुमच्या मागण्या मान्य करण्यापर्यंत दूध रस्त्यावर फेकणे हे किती योग्य आहे एखाद्या उपाशी पोटी बाळांची,गरिबांची भूक त्या दुधाने मिटेल दूध उत्पादक संघानी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन जरूर करावे परंतु रस्त्यावर दूध कृपया फेकू नये हिच आम्हा जनसामान्यांची इच्छा.

जामखेडमध्ये दूध रस्त्यावर ओतले स्वाभिमानीचे आंदोलन

दूध बंद आंदोलन News Photo

(जामखेड) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दूधाच्या दरात १० रुपये वाढ करावी, या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकायांनी तालुक्यात दूध बंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी सकाळी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, संघटनाप्रमुख हनुमान उगले, युवक तालुकाध्यक्ष अ‍ॅड. ऋषीकेश डुचे, शहरध्यक्ष भाऊसाहेब डोके, उपसरपंच बाळासाहेब ठाकरे, जनार्दन भोंडवे, नितीन जगताप, अशोक आजबे,प्रदीप वाळुंजकर, आप्पासाहेब डोके, बंडू मुळे,महादेव डोके, बाबू साळुंखे, आबासाहेब जाधव, अशोक जगदाळे, ईश्वर खैरे,अमोल खैरे, अशोक खैरे, तात्या भिसे, सागर लोंढे, विठ्ठल पोटे, अविराज मोरे, अश्विन खैरे आदी उपस्थित होते.

दूध बंद आंदोलन News Photo

दुधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हभर आंदोलन सुरू केले आहे.नगर जिल्ह्यात आज जामखेड, नेवासा आदी भागात आंदोलन सुरू झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दूधाच्या दरात १० रुपये वाढ करावी,या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकाºयांनी तालुक्यात दूध बंद आंदोलन पुकारले आहे.मंगळवारी सकाळी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.

दूध बंद आंदोलन News Photo

या आंदोलनात दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, संघटनाप्रमुख हनुमान उगले, युवक तालुकाध्यक्ष अ‍ॅड. ऋषीकेश डुचे, शहरध्यक्ष भाऊसाहेब डोके, उपसरपंच बाळासाहेब ठाकरे, जनार्दन भोंडवे, नितीन जगताप, अशोक आजबे, प्रदीप वाळुंजकर, आप्पासाहेब डोके, बंडू मुळे,महादेव डोके, बाबू साळुंखे, आबासाहेब जाधव, अशोक जगदाळे, ईश्वर खैरे, अमोल खैरे, अशोक खैरे, तात्या भिसे, सागर लोंढे, विठ्ठल पोटे, अविराज मोरे, अश्विन खैरे आदी उपस्थित होते.दुधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हभर आंदोलन सुरू केले आहे.