राज्यात आज 8348 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 300937 अशी झाली आहे. आज नवीन 5306 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 165663 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 123377 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबई, दि.१८ : राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६६३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील    

मुंबई: बाधित रुग्ण- (१,००,३५०), बरे झालेले रुग्ण- (७०,४९२), मृत्यू- (५६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,९१७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७३,२८९), बरे झालेले रुग्ण- (३४,०१७), मृत्यू- (१९६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७,२९५)

पुणे: बाधित रुग्ण- (५१,५७५), बरे झालेले रुग्ण- (१८,८८१), मृत्यू- (१३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,३८०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (९४५५), बरे झालेले रुग्ण- (५२३४), मृत्यू- (३६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (५३१८), बरे झालेले रुग्ण- (२४३३), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०२)

नाशिक: बाधित रुग्ण- (८९६८), बरे झालेले रुग्ण- (५०८५), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२६)